‘ओव्हल’वर टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा गेम ‘ओव्हर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कॅनबेरा

अॅडलेड येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध हिंदुस्थान क्रिकेट कसोटी मालिकेत हिंदुस्थानने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यजमान कांगारूंना त्यांच्याच भूमीवर नमवत टीम इंडियाने इतिहास रचला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवत पहिली कसोटी जिंकली आहे. रविवारी हिंदुस्थान व यजमान ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ संघांमधील पहिला कसोटी क्रिकेट सामना भलताच रोमहर्षक वळणावर आला होता.

पाहुण्या ‘टीम इंडिया’ला विजयासाठी 6 बळी हवे होते, तर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 219 धावांची गरज होती. सामना दोलायमान अवस्थेत असल्याने कोण जिंकणार याची उत्सुकता लागून राहिली होती. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात उर्वरित 49 षटकांच्या खेळात 4 बाद 104 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शॉन मार्श 31, तर ट्रव्हिस हेड 11 धावांवर खेळत होते. अखेर हिंदुस्थानने कांगारूंना नमवत कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे.