हिंदुस्थानी वंशाचे डॉ. राज अय्यर अमेरिकन लष्कराच्या सीआयओपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वंशाचे  डॉक्टर राज अय्यर यांची  अमेरिकन लष्कराच्या  मुख्य माहिती  अधिकारीपदी  (सीआयओ) नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अय्यर हे अमेरिकन सेनेच्या उच्च पदावर नियुक्ती होणारे पहिले हिंदुस्थानी अधिकारी आहेत. पेंटागॉनने त्यांच्या नियुक्तीचे संकेत गेल्या वर्षीच दिले होते.

डॉ. अय्यर यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगमध्ये पीएचडी केलेली आहे. 26 वर्षे अमेरिकन सेनेच्या सेवेत असणारे डॉ. अय्यर यांचे बालपण तामीळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथे गेले. त्यांनी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी, तिरुची येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली.त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि तिथेच स्थायिक झाले.