हिंदुस्थानी लष्कराची भेदक कामगिरी; पाकड्यांचे ड्रोन पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

हिंदुस्थानी हवाई दलाने ‘एअर स्ट्राईक’ केल्यानंतरही पाकडय़ांच्या कुरापती सुरूच आहेत. राजस्थानात श्रीगंगानगर परिसरात आज आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेले पाकिस्तानचे ड्रोन हिंदुस्थानी लष्कराने पाडले आहे.

शनिवारी पहाटे 5.40 वाजता हिंदुस्थानी हद्दीत ड्रोन घुसण्याच्या प्रयत्नात होते, मात्र सतर्क असलेल्या बीएसएफच्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू करताच ड्रोन माघारी पाकच्या दिशेने गेले. मात्र काही वेळात ड्रोन श्रीगंगानगर परिसरात आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसण्याचा प्रयत्न करीत होते. बीएसएफच्या जवानांनी ड्रोन पाडले. 26 फेब्रुवारीपासून हिंदुस्थानी जवानांनी पाकडय़ांचे हे तिसरे ड्रोन पाडले आहे. पाच दिवसांपूर्वीच राजस्थानमधील बिकानेर येथील नाल सेक्टरमध्ये ड्रोन पाडले. सुखोई-30 विमानाने हे ड्रोन पाडले होते. त्यानंतर पुन्हा दुसरे ड्रोन पाडले. आज तिसरे ड्रोन पाडण्यात आले.