नंबर 2 टीमची इज्जत गेली, नको त्या रेकॉर्डचा मुकुट डोक्यावर चढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, हॅमिल्टन

गल्लीत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांपेक्षा वाईट खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नावे गुरुवारी अनेक लाजिरवाणे रेकॉर्ड नोंदवले गेले. क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ असलेल्या हिंदुस्थानी संघाचे असे पानिपत होईल याची कोणी अपेक्षाही केली नव्हती. हिंदुस्थानी संघ या सामन्यामध्ये फक्त 92 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडच्या संघाने हे आव्हान फक्त 14.4 षटकात पूर्ण केलं.

या सामन्यामध्ये हिंदुस्थानी संघाच्या खात्यात लिहले गेलेले लाजिरवाणे रेकॉर्ड खालीलप्रमाणे आहेत.

  • न्यूझीलंडच्या संघाने 212 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या फरकाचा पराभव आहे.
  • 2010 साली श्रीलंकेने हिंदुस्थानी संघाला 209 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना पराभूत केलं होतं.
  • 2012 साली श्रीलंकेनेच हिंदुस्थानला 181 चेंडू शिल्लक असताना पराभूत केलं होतं.
  • हिंदुस्थानी संघाला पहिला मोठा पराभव 1981 साली स्वीकारावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानी संघाला 174 चेंडू शिल्लक असताना पराभूत केलं होतं.
  • हिंदुस्थानी संघातील फक्त 4 फलंदाजांना 2 आकडी धावसंख्या गाठता आली.
  • 18 धावांपलिकडे एकाही फलंदाजाला मजल मारता आली नाही.
  • दोन फलंदाज 0 धावांवर तर अन्य दोन फलंदाज 1 धाव काढून बाद झाले.
  • हिंदुस्थानी संघाच्या 92 धावांमध्ये 6 धावा या वाईडमुळे मिळाल्या आहेत.
  • न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी 30.5 षटकांपैकी 8 षटके निर्धाव टाकली.