
राष्ट्रीय ब्रेकिंग चॅम्पियनशिप 2021 हा भव्य कार्यक्रम नुकताच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे पार पडला. ब्रेकडान्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया डान्स स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष अरविंद कुमार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे हिंदुस्थानातील अनेक राज्यातील ब्रेक डान्सर्सनी अप्रतिम नृत्य सादर केले. येत्या जानेवारी 2022 मध्ये दिल्लीतही या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर देशातील प्रत्येक राज्यात प्रतिभावान ब्रेक डान्सर्स निवडण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाईल. यापैकी प्रतिभावान मुला-मुलींची निवड केली जाईल जे पॅरिस येथे होणाऱया ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील.
ऑल इंडिया डान्स स्पोर्ट्स फेडरेशनचे सरचिटणीस विश्वजित मोहंती, विष्णू शंकर, फिजिओथेरपिस्ट डॉ. बीएल चौधरी, अभिनेता सजनिश झा आणि ‘इनसाइड द डिप्लोमॅट माइंड’ या वेब सीरिजचे निर्माते अश्विनी कुमार यांची राष्ट्रीय ब्रेकिंग चॅम्पियनशिप 2021 मध्ये विशेष उपस्थिती होती. मनीषा सिंग, अध्यक्षा, आर्मएलसी फिजिओथेरपी यांनी आपल्या अनुपस्थितीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आर्मएलसी फिजिओथेरपीचे संचालक डॉ. बी. एल. चौधरी यांच्यामार्फत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.




























































