देशी स्पायडरमॅन, चिखलातून रस्ता पार करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सध्या एका देशी स्पायडरमॅनची चर्चा रंगली आहे. हा तरूण स्पायडरमॅनप्रमाणे भिंतीवर चढून चिखलातून सहजरीत्या रस्ता पार करताना दिसत आहे. त्याचे हे टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओत दिसतेय की, हा तरुण सायकलवर भलमोठं गाठोड घेऊन जात आहे. अचानक रस्त्यावर चिखल दिसतो. आता या चिखलातून तो सायकल कशी घेऊन जाणार, असा प्रश्न पडतो. परंतु हा तरुण अनोखी शक्कल लढवतो. दोन्ही हाताने तो सायकल घट्ट धरतो आणि आपले दोन्ही पाय भिंतीला टेकवतो. अशाप्रकारे तो चिखलातील रस्ता सहजरीत्या पार करतो. ‘इच्छा असेल तर मार्ग निघतोच’ हेच या देशी स्पायडरमॅनने दाखवून दिले आहे.