हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या फिटनेस प्रशिक्षकपदी तनुजा लेले हिची निवड

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, स्ट्रेंथ अँड फिटनेस प्रशिक्षिका तनुजा लेले हिची हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची फिटनेस प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

तनुजा ही सिंधुदुर्गच्या मणचे मुटाट गावची कन्या आहे. हिंदुस्थान विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये लखनौ येथे 7 ते 24 मार्च या कालावधीत होणाऱया वन-डे व टी-20 मालिकांसाठी ही निवड झाली आहे. तनुजा लेले ही 2019 पासून स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात कामकाज पाहत आहे. तनुजाच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे, कार्यकारी अधिकारी प्रीतम केसकर व प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वतीने तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या