
इंडिगो एअरलाइन्समध्ये पायलट असलेल्या तरुणीने आपल्या आईवडिलांचे आणि आजीआजोबांचे विमानात स्वागत केले. तो क्षण पाहून कुटुंबाच्या डोळ्यांत अभिमान आणि आनंदाचे अश्रू दाटले. तनिष्का मुदगल असे पायलट तरुणीचे नाव आहे. तिने विमानात प्रवेश करताना सर्व कुटुंबाचे हसत हसत स्वागत केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने नेटीजन्स भावुक झाले. आतापर्यंत 88 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तनिष्काने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले – ‘जणू आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटलं. माझ्यासाठी आई-वडिलांनी केलेला त्याग, आजी-आजोबांनी केलेल्या प्रार्थना आणि सतत दिलेला आधार या सगळ्याचं फळ आजच्या या क्षणाला मला मिळाले आहे. ’