इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, चेन्नई विमानतळावर सुरक्षित लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indigo
फाईल फोटो

कोलकाताहून चेन्नईला चाललेल्या इंडिगोच्या विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाला. चेन्नई विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानात 224 जण होते. सर्वांना सुखरुप उतरवण्यात आले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे 6E-723 हे विमान मंगळवारी रात्री कोलकाताहून चेन्नईला चालले होते. हवेतच विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे चेन्नई विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानाचे सुरक्षित लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक त्या आपत्कालीन उपाययोजना करण्यात आल्या.

अखेर रात्री 11.37 वाजता 25 क्रमांकाच्या धावपट्टीवर विमान सुरक्षितपणे उतरले. त्यानंतर रात्री 11.47 वाजता ही पूर्ण आणीबाणी अधिकृतपणे मागे घेण्यात आली. विमानतळावरील सर्व कामकाज आता सुरळीत सुरू आहे, असे चेन्नई विमानतळ प्राधिकरणाने निवेदनात सांगितले.