सुधा मुर्ती खरच भाजी विकत होत्या? वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

गेल्या काही दिवसांत लेखिका आणि इन्फ़ोसिसच्या सह संस्थापक सुधार मुर्ती या भाजी विकतानाचा एक फोटो व्हायरल होत होता. तसेच सुधा मुर्ती दरवर्षी मंदिराबाहेर भाजी विकतात असा दावा या फोटोच्या माध्यमातून करण्यात आला होता. पण या फोटोमागील सत्य वेगळेच आहे.

सुधा मुर्ती दर वर्षी भाजी विकतात त्यामुळे श्रीमंत असूनही आपल्यात अहंकार निर्माण होत नाही अशा कॅप्शनवरून हा फोटो फिरत होता. पण ही बाब खोटी असल्याचे समोर आले आहे. सुधा मुर्ती अशा प्रकारे भाज्या विकत नव्हत्या. तीन वर्षापूर्वी बँगलोर मिररला त्यांनी एक मुलाखात दिली होती. त्यात सुधा मुर्ती म्हणाल्या होत्या की, तीन वर्षातून एकदा पहाटे ३ वाजता उठून जवळील राघवेंद्र मंदिरात सेवा करण्यासाठी जातात. त्यांच्या दिमतीला त्यांचा नोकरही असतो. यावेळी सुधा मुर्ती मोठ्या प्रमाणात  भाजी आणि धान्य मंदिरात पोहोचवतात. हा फोटो त्याचवेळचा आहे.

सुधा मुर्ती कुठल्याही प्रकारे भाज्या विकत नाहीत, सोशल मीडियावरील हा दावा खोटा निघाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या