
पुणे शहर पोलीस दलातील तीन पोलीस निक्षकांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनीट तीनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांची लोणीकाळभोर पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांची गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

























































