
गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभेतील युवासेनेच्या (युवती) पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती उद्या, रविवार 25 जून रोजी घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.
गोरेगाव विधानसभेकरिता सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत मध्यवर्ती कार्यालय, जवाहर नगर हॉलसमोर, एस. व्ही. रोड गोरेगाव (पश्चिम) येथे मुलाखती होतील, तर दिंडोशी विधानसभेकरिता दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत शिवसेना शाखा क्र. 42 मुख्य कार्यालय, वायशेत पाडा, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व) येथे मुलाखती होतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित रहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.































































