
14 सप्टेंबर रोजी iPhone 13 लॉन्च होणार आहे. नेटवर्क नसताना आता कॉल आणि मेसेज करता येणार आहे. त्यासाठी फोनमध्ये लो आर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कम्युनिकेशन नावाचे फीचर आसणार आहे.
Apple च्या iPhone 13 सीरीज ग्राहकांसाठी खास असणार आहे. या फोनमध्ये LEB म्हणजेच लो आर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कम्युनिकेशन नावाचे फीचर असणार आहे. त्यामुळे रेंज किंवा नेटवर्क असो वा नसो ग्राहकाला फोन कॉल आणि मेसेजेस करता येणार आहे. ऍपल कंपनीने 2019 साली LEO Satellite या फीचरचा उपयोग केला होता. आता कंपनीने हा फीचर पहिल्यांदाच फोनसाठी आणला आहे.
हे असतील फीचर्स
iPhone 13 मध्ये नाईट मोड कॅमेरा असणार आहे असे सांगण्यात येत आहे. तसेच फोनमध्ये 512 जीबीची इंटर्नल मेमरी आणि 5G असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनची किंमत iPhone 12 पेक्षा कमी असणार आहे. Iphone 13 4GB RAM असलेल्य फोनची किंमत 973 डॉलर म्हणजेच 71 हजार 512 इतकी असणार आहे. तर 128 इंटर्नल मेलरी असलेल्या फोनची किंमत 1051 डॉलर म्हणजेच 77 हजार 254 इतकी असणार आहे.





























































