IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची 3 वेळची विजेता चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात यंदा चांगली झाली, मात्र त्यानंतर सलग दोन लढतीत धोनीच्या संघाला पराभव सहन करावा लागला. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला 44 धावांनी पराभूत केले. यामुळे चेन्नईच्या संघावर टीकाही होत आहे.

सोशल मीडियावर ‘वयोवृद्ध खेळाडुंचा संघ’ असे चेन्नईला हिणवले जात आहे. यात टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागही मागे नाही. सेहवागने ट्विट करून चेन्नईच्या खेळाडूंना पुढील लढतीसाठी मैदानात उतरताना ग्लुकोज चढवून या असा मिश्किल सल्ला दिला आहे.

IPL 2020 – सहकाऱ्यांना खेळताना पाहून ढसाढसा रडायचा ‘हा’ खेळाडू, द्रविडच्या सल्ल्याने बदललं आयुष्य

दिल्लीच्या संघाने दिलेले 176 धावांचे आव्हान चेन्नईच्या संघाला पेलवले नाही आणि त्यांचा संघ 131 धावात गारद झाला. चेन्नईच्या संघाची निराशाजनक फलंदाजी पाहून वीरेंद्र सेहवागही ट्विट करण्यावाचून स्वतःला रोखू शकला नाही. ‘चेन्नईची फलंदाजी चालत नाहीय. पुढच्या लढतीत मैदानात उतरण्याआधी खेळाडूंना ग्लुकोज चढवावे लागेल’, असे ट्विट विरुने केले आहे.

दरम्यान, सलग दोन सामने गमावल्यानंतर कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी टीम असंतुलित असल्याचे मान्य केले आहे. येणाऱ्या काळात नवीन रणनीती घेऊन मैदानात उतरावे लागेल असेही ते म्हणाले. अंबाती रायडू जायबंदी झाल्याने संघाचे संतुलन बिघडले आहे. मात्र चेन्नईच्या संघाला जवळपास 1 आठवडे आराम असून 2 ऑक्टोबरला सनरायझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध मैदानात उतरायचे आहे. तोपर्यंत रायडू दुखापतीतून सावरेल अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या