IPL 2026 – तुमच्याकडे जसप्रीत बुमराह असूनही 220 धावा कशा दिल्या? दिग्गज खेळाडूने MI च्या नेतृत्वावर ओढले ताशेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात रंगला. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या लढतीत केकेआरने 220 धावांचा डोंगर उभारला होता, मात्र रोहित शर्मा आणि रिकल्टन यांच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर मुंबईने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. मात्र या लढतीनंतर हिंदुस्थानच्या माजी खेळाडूवर मुंबईच्या नेतृत्वावर ताशेरे ओढले. मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहसारखा जागतिक दर्जाचा गोलंदाज असूनही त्यांनी इतक्या धावा कशा दिल्या? असा सवाल आकाश चोप्रा याने विचारला आहे. तो आपल्या युट्यूब चॅनलवर बोलत होता.

गोलंदाज नक्की कुठे आहेत? मुंबईकडे गोलंदाजीचा तुटवडा नाही. आरसीबी किंवा एसआरएचच्या बाबतीत मी समजू शकतो, पण मुंबईकडे तर बुमराह आहे. तुमच्या संघात बुमराह असतानाही जर तुम्ही 220 धावा देत असाल, तर नक्की काय चाललंय? हे आयपीएल आहे, विश्वचषक नाही, असा टोला आकाश चोप्रा याने मुंबईला लगावला.

चोप्राने कर्णधार हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीतील बदलांच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सामन्यात हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या दोनच गोलंदाजांनी सलग षटके टाकली. ट्रेंट बोल्ट सारख्या नवीन चेंडूने विकेट घेऊ शकणाऱ्या गोलंदाजाला चार वेगवेगळे स्पेलमध्ये गोलंदाजी करायला लावली. बोल्टला केवळ एक षटक दिल्यानंतर लगेच थांबवण्यात आले, जे अनाकलनीय होते, असेही आकाश चोप्रा म्हणाला.

मुंबई इंडियन्सचा अपशकुनावर विजय, अखेर 13 वर्षांनी सलामीहाराला चिरडले; वानखेडेवर मुंबईकरांची आतषबाजी