IPL मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूवर जीवघेणा हल्ला, दोन्ही हाताच्या नसा कापल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये मुंबई इंडीयन्स या IPL संघातील क्रिकेटपटूवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. प्रशांत तिवारी असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. हल्लेखोरांनी प्रशांतच्या दोन्ही हाताच्या नसा कापल्या असून आता तू IPL खेळून दाखवच अशी धमकीही दिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी प्रशांत आणि त्याचा भाऊ प्रभात हे बोलत होते. शेजारी राहणाऱ्या संदीप आणि मंदीप यांनी अचानक शिवीगाळ करत आरडाओरडा करायला सुरुवात केली. यामुळे प्रशांत आणि त्याच्या भावाचं शेजारच्यांसोबत भांडण झालं. यामुळे संतापलेले संदीप आणि मंदीन हे त्याच्या कुटुंबीयांसह प्रशांतच्या घरात घुसले. या दोघांना प्रशांतच्या मोठअया भावाला घरातून खेचून बाहेर आणलं आणि लाठ्याकाठ्यांनी त्याला बडवला. प्रशांतच्या हाताच्या नसा या दोघांनी दारूची बाटली फोडून या बाटलीच्या काचेने कापल्या. आजपासून आयपीएलची सुरूवात होत असून मुंबई इंडीयन्स संघात राखीव खेळाडू असलेल्या प्रशांतला कदाचित स्पर्धा संपेपर्यंत रुग्णालयातच रहावं लागेल