आयपीएलचे मिनी ऑक्शन फेब्रुवारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 14वा हंगामही आता जवळ आलाय. त्यामुळे 2021च्या सत्रासाठी 11 फेब्रुवारीला क्रिकेटपटूंचे मिनी ऑक्शन होण्याची शक्यता आहे. कारण आयपीएलमधील आठही संघ मालकांना 20 जानेवारीपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

यंदाच्या आयपीएलचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी 11 एप्रिल ते 6 जून या कालावधीत ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी अर्धातच पहिली पसंती ही हिंदुस्थानच असेल. मात्र कोरोना अद्यापि अटोक्यात आलेला नाहीये. त्यामुळे यंदाही टी-20 स्पर्धा यूएईमध्ये होण्याची शक्यता बळावली आहे.