Iran Israel US War – परिणामांना तयार राहा! राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांचा इस्रायलसह अमेरिकेला थेट इशारा, जगाचा थरकाप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणवर अचानकपणे हल्ला करत इस्रायल आणि अमेरिकेने अघोषित युद्धाला सुरुवात केली होती. हे थेट युद्ध नसले तरी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू होते. आता इराणने मात्र थेट घोषणा केली आहे. आपण युद्धाच्या नव्या फेजमध्ये प्रवेश करत असल्याचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, इराणने आता युद्धाच्या एका नवीन आणि अधिक धोकादायक टप्प्यात प्रवेश केला आहे.

पेझेश्कियान यांच्या दाव्यानुसार, इराणकडील जुन्या क्षेपणास्त्रांचा साठा आता संपला आहे. इराणने आतापर्यंत केवळ प्राथमिक शस्त्रे वापरली होती, असा दावा यातून ध्वनित होत आहे.

आता इराणची खरी लष्करी ताकद आणि तंत्रज्ञान जगासमोर येईल. इराणने आपल्या ‘खैबर शेकन-४’ (Kheibar Shekan-4) या अत्याधुनिक आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर सुरू करण्याची घोषणा केली आहे.

ही क्षेपणास्त्रे प्रामुख्याने इस्रायल, आखाती देश आणि या प्रदेशात तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी दलांवर डागली जातील. यामुळे युद्धाची व्याप्ती प्रचंड वाढणार आहे.

ज्या देशांनी किंवा शक्तींनी इराणच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना येणाऱ्या काही तासांतच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पेझेश्कियान यांनी दिली आहे.

दरम्यान अमेरिका आणि इस्रायल देखील आता सतर्क झाले असून इराणचे हल्ले रोखण्यासाठी त्यांनी यंत्रणा सज्ज केल्याचे समजते आहे. तसेच इराण काही करण्याआधीच पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायल कडून मोठे हल्ले होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. याचे परिणाम जगभरात पाहायला मिळतील असे म्हटले जात आहे.