
शेतकऱयाकडून मोजणीसाठी सात हजार रुपयांची लाच घेणारा पाटबंधारे विभागातील मोजणी कर्मचारी सुखदेव मारुती सुतार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
शेतजमीन विक्री करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे अर्ज केला होता. हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी बार्शी तालुक्यातील जळगाव शाखेतील मोजणीदार सुखदेव मारुती सुतार याच्याकडे आला होता. सुतार याने हा दाखला देण्यासाठी आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली होती. सायंकाळी वैरागमधील मार्कटयार्डजवळ लाच घेताना सुतार याला पकडले आहे.
























































