
सामना ऑनलाईन । कोलकाता
सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाकप्रकरणी याचिका दाखल करणाऱया भाजप सदस्य इशरत जहाँ यांना हनुमान चालिसा वाचन कार्यक्रमात सहभागी झाल्याने ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
दीर आणि घरमालकाने धमकी दिली आहेच पण त्याचबरोबर 100 जणांच्या जमावाने काल घरी येत असताना आपली वाट अडवली आणि हिंदूंच्या कार्यक्रमात सहभागी का झाला होता, असा जाब विचारला. या प्रकरणी जहाँ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मी एक सुजाण नागरिक म्हणून माझे कर्तव्य पार पाडले आहे. मी धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडूनही ठार मारण्याची धमकी मिळत आहे, असेही त्या म्हणाल्या.


























































