
इस्रायल आणि हमास यांच्यात पाच महिन्यांपासून युद्ध सुरूच आहे. या युद्धामुळे गाझामध्ये प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गाझामध्ये जागोजागी मातीचे ढिगारे साचले आहेत. यूएनच्या दाव्यानुसार, गाझात 2 कोटी 30 लाख टन मातीचे ढिगारे साचले असून याला हटवण्यासाठी अनेक वर्षे लागतील तसेच अनेक कोटी रुपये खर्च होतील, असे यूएनने म्हटले आहे. गाझामध्ये इस्रायलकडून दररोज बॉम्बस्पह्ट आणि गोळीबार केला जात आहे. यात रोज नागरिक मरत आहेत. इस्रालयच्या रोजच्या हल्ल्यामुळे 20 लाखांहून जास्त गाझामधील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लोक सैरावैरा पळत आहेत. जीव मुठीत घेऊन मदतीची अपेक्षा धरत आहेत. या हल्ल्यात इस्रायलचे जवळपास 1200 लोक ठार झाले आहेत. तर 250 हून अधिक लोकांना बंधक बनवण्यात आले होते. परंतु या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील 31 हजारांहून जास्त पॅलेस्टीन नागरिक ठार झाले असून 70 हजारांहून जास्त लोक जखमी झाले आहेत.
समुद्रमार्गे मदत
गाझामधील पीडित नागरिकांना समुद्रमार्गे मदत पोहोचवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सायप्रसहून जहाजाद्वारे मदत रवाना करण्यात आली. ‘ओपन आर्म्स’ हे जहाज शुक्रवारी गाझाच्या किनाऱयावर पोहोचले. या जहाजात जवळपास 200 टन मदतीचे सामान होते. लवकरच मदतीचे सामान घेऊन दुसरे जहाज पोहोचेल.





























































