Israel Iran War – एअर इंडियाचे एक विमान दुबईहून दिल्लीत आले; दुबईला जाणारी तीन विमाने टेक ऑफ नंतर माघारी परतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल -इराण युद्धामुळे आखाती देशासह जगभरात तणाव वाढत आहे. अनेक आखाती देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या देशाची हवाई हद्द बंद केली आहे. वाढत्या तणाव आणि बॉम्बस्फोटांमुळे परिस्थिती सतत बिकट होत आहे. या हल्ल्यांचा परिणाम हवाई प्रवासावर दिसून येत आहे. या तणावादरम्यान, दुबईहून एअर इंडियाचे पहिले विमान दिल्लीत पोहोचले. दुबईत अडकलेल्या प्रवाशांना घेऊन जाणारे एआय 916 विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरले आहे. एअर इंडियाचे एक विमान दुबईहून दिल्लीत पोहोचले, तर दुबईला जाणारी तीन विमाने टेक ऑफ नंतर माघारी परतली आहेत.

वाढत्या तणावानंतर एअर इंडियाचे पहिले विमान मंगळवारी दुबईहून दिल्लीत पोहोचले. हिंदुस्थानकडून दुबईला जाणाऱ्या चार एमिरेट्स विमानांपैकी तीन विमानांना उड्डाणानंतर माघारी परतावे लागले. ड्रोन हल्ल्यांच्या वृत्तांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रियाधला जाणाऱ्या काही विमानांचा मार्ग वळवण्यात आला आहे. हिंदुस्थानकडून दुबईला जाणाऱ्या चार एमिरेट्स विमानांपैकी तीन विमानांना उड्डाणानंतर परतावे लागले. दोनदा मार्ग बदलल्यानंतर अखेर ३ मार्च रोजी फ्लाइट ईके ५०१ (मुंबई-दुबई) दुबईत उतरली. इतर तीन विमानांना आपापल्या तळांवर माघारी परतावे लागले.

दिल्लीहून दुबईला जाणारे फ्लाइटने ईके ५१३ सकाळी ४:३५ वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले परंतु उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परत वळवण्यात आले. तसेच, बेंगळुरू-दुबई फ्लाइट EK 569 ला टेकऑफनंतर बेंगळुरूला परतले. चेन्नई-दुबई फ्लाइट EK 543 ला देखील टेकऑफनंतर चेन्नईला परतले. ड्रोन हल्ल्याच्या वृत्तांमुळे खबरदारी म्हणून रियाधला जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कॅनडाहून इस्रायल आणि दुबईला जाणाऱ्या फ्लाइट्स 22 मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 23 मार्च रोजी सेवा पुन्हा सुरू होतील.