जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. श्रीनगरचे पोलीस अधीक्षक डॉ. हसीब मुगल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून एक चिनी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझीन आणि 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

टॉपच्या कमांडरसह 66 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

गेल्या शुक्रवारी श्रीनगरमधील चानपोरो येथील पोलीस स्थानकावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा हात होता अशी माहिती मुगल यांनी दिली. या तिन्ही दहशतवाद्यांना बडगाम येथून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्यारं जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

याआधी खोऱ्यात गेल्या तीन महिन्यामध्ये लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी समोर आली होती. जानेवारी 2019 ते आतापर्यंत खोऱ्यात 66 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यातील 27 दहशतवादी हे पुलवामा हल्ला घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत. यापैकी 19 दहशतवादी हे पुलवामा हल्ल्यानंतर ठार करण्यात आले आहेत. तसेच अनेक दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.