जॅग्वार कारमध्ये एअर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जॅग्वार लॅंण्ड रोव्हरच्या भविष्यातील केबिन एअर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाने चाचण्यांमध्ये जवळपास 97 टक्क्यांपर्यंत अंतर्गत विषाणू आणि हवेतील जीवाणूंचा खात्मा करण्यात सक्षमता दाखवली आहे. प्रोटोटाईप हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग यंत्रणेत पॅनासोनिकच्या नॅनो एक्स तंत्रज्ञानाचा वापर घातक विषाणूंचा खात्मा करण्यासाठी केला आहे. याचा उपयोग भविष्यात जॅग्वार आणि लँड रोव्हर मॉडेल्सना एक खास ग्राहक अनुभव देता येण्यासाठी केला जाईल. एक नावीन्यपूर्ण प्री कंडिशनिंग फीचरही यात उपलब्ध आहे, जेणेकरून ग्राहकांना वाहनात बसण्यापूर्वी ही यंत्रणा सुरू करता येईल.