महिलांवरील अत्याचार; ९५ टक्के चूक मुलींची!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सीकर

‘महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये ९५ टक्के चूक ही मुलींची असते’ असे वादग्रस्त विधान जैन मुनी विश्रांत सागर यांनी केले आहे. तसेच ‘मुली म्हणजे वस्तू असतात, त्यांनी संयम ठेवून वागले पाहिजे’ असेही त्यांनी सांगितले.

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात चार्तुमासानिमित्त पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. पंजाब केसरीने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. मुनी म्हणाले की “सध्याच्या काळात मुलींनी सांभाळून वागले पाहिजे. त्याचे कारण मुलींना आपल्या माहेर आणि सासरची अब्रु राखायची असते.” तसेच मुली या वस्तू असल्याचेही त्यांनी सांगितले आणि सद्यकाळात मुलींनी पाश्चात्य संस्कृतीचे पालन न करता संस्कारांसह शिक्षण घेतले पाहिजे असेही नमूद केले.