सट्टाबाजारात एनडीएचीच हवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जैसलमेर

राजस्थानात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यशासह सत्ता मिळवली असली तरी आताचे देशातील देशभक्तीची लाट पाहता त्यांनी हुरळून जायचे कारण नाही, असे मत राजस्थानच्या सट्टा बाजाराने व्यक्त केले आहे. जोधपूर नजीकच्या फालोडी सट्टा बाजाराने 17व्या लोकसभेत भाजपला 250हून अधिक जागा मिळतील तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी 300 ते 310 जागा मिळवेल असे अंदाज वर्तवले आहेत. काँग्रेसला देशात पहिल्याहूनही कमी जागा जिंकता येतील असाही या सट्टेबाजांचा कयास आहे.

पाकिस्तानला धडा शिकवल्यामुळे पुन्हा एनडीएची लाट

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामात दहशतवादी हल्ला करीत 40 हिंदुस्थानी जवानांचे बळी घेतले त्याचा राग सवाशे कोटी हिंदुस्थानींच्या मनात खदखदत होता. कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवायलाच हवा, असे देशातील बहुतांश नागरिकांचे आग्रही मत होते. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांवर पाकिस्तानात घुसून हवाईहल्ला करणाऱया जवानांबद्दल आणि या हल्ल्याचा निर्णय घेणाऱया एनडीए सरकारबद्दल नागरिकांना अभिमान वाटू लागला आहे. या भावनेतूनच पुन्हा एनडीएची लाट देशात जोरात वाहू लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पाकिस्तानवर केलेल्या हवाईहल्ल्यामुळे देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेमाची तीव्र भावना निर्माण झाली आहे.

सट्टा बाजाराच्या मते यंदा काँग्रेसला देशात केवळ 72 ते 74 जागांवरच समाधान मानावे लागेल.
राजस्थानात 25 लोकसभा जागांपैकी 18 ते 20 जागा भाजपच्या वाटय़ाला जातील असेही सट्टेबाजांचे मत आहे.