जालना – पत्नीचा खून करून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे येथे संजय अंकुश पवार (30) आणि त्याची पत्नी संगीता पवार (27) या दोघांमध्ये घरगुती वादातून नेहमी भांडण होत होती. 12 मे रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास संजय पवार हा पत्नी संगीता हीस घर आतून बंद करून मारहाण करीत होता. त्यानंतर त्याने संगीताच्या डोक्यात लोखंडी पहारीचे वार करून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर त्याने शेतात जाऊन दोरखंडाने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांची ८ ते ५ वर्षे वयोगटातील तीन मुले गावात खेळत होती. पत्नीला मारहाण सुरू असताना शेजारी राहणार्‍या नातेवाईकांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र संजय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांही मयतांचे मृतदेह स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत.