जालना – 63 किलो गांजासह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरात विक्रीसाठी येणारा 63 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत जालन्यातील रोहनवाडी रोडवरून जप्त केला आहे. ही कार्यवाही काल 8 सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.

जालना दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना खबऱ्याने स्वीफ्ट डिझायर कारमधून (क्र. एम. एच. MH 14 सीएक्स 9299) गांजाची चोरटी विक्री करण्यासाठी काही लोक रेवगावकडून जालना शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहनवाडी रोडवर स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी सापळा लावला. स्वीफ्ट डिझायर कार येताच पोलिसांनी तिला अडवले.

पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये 63 किला 225 ग्राम गांजा आढळून आलवा. याची किंमत बाजारामध्ये 12 लाख 6 हजार 400 रुपये आहे. पोलिसांनी गांजासह 5 लाख 50 हजार रुपये किंमतीची कार व 1500 रुपये असा एकूण 18 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. कारचालक महादेव जालीधर हरकळ (रा. दिद्रुड ता. माजलगाव जि. बीड), इकबाल अहेमद शफी अहेमद (रा. नुतन वसाहत, जालना, मुळ गाव गेवराई ता. गेवराई जि. बीड), गणेश संपत्ती मेंडके (रा. दिद्रुड ता. माजलगाव जि. बीड) या तिघांविरुध्द जालना पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, यासीन शेख, पोलिस अंमलदार अंकुश राठोड, पोलीस अंमलदार रशीद शेख, कुरेवाड, राजेश घुगे, दिनेश बर्डे, ए. बी. अडीयाल, आर.डी.रंगे, रामेश्वर जावध, अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, रुस्तुम जैवाळ, रंजित वैराळ, प्रशात लोखंडे, गणेश वाघ, चालक मनोज कांबळे यांनी केली.