आयआयटी मास्टर्ससाठी ‘जेएएम’ परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयआयटी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी जेएएम (जॉइंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स) द्यावी लागते. एमएससी, एमएससी टेक्निकल, रिसर्च, डय़ुएल डिग्री, एमएससी पीएचडी  इत्यादी अभ्यासक्रमांसाठी जेएएम संयुक्त परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

परीक्षा पात्रता 

विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले विद्यार्थी जेएएम 2024 मध्ये होणाऱया संयुक्त परीक्षेस पात्र असतील. तसेच संस्थेच्या प्रवेशाच्या अटी व शर्तीनुसार परदेशातील शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेले विद्यार्थीसुद्धा या परीक्षेस पात्र आहेत.

प्रवेशासाठी पात्रता

जेएएम परीक्षेत उत्तीर्ण झालेले, गुणवत्ता तसेच अपेक्षित शैक्षणिक अर्हता असलेले सर्व विद्यार्थी  प्रवेशास पात्र ठरतील.

जेएएम परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे उच्च शिक्षणासाठी प्रवेशांची हमी, शिष्यवृत्ती किंवा कोणतेही आर्थिक सहाय्य नव्हे.

 

जेएएम परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालीलपैकी संस्थांमधील पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठीसुद्धा पात्र ठरतात

l इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, पुणे.

l इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम ऍण्ड एनर्जी, विशाखापट्टणम.

l जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च,  बंगळुरू.

l आयआयटीच्या सर्व सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिटय़ूट.

l देशातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 31  संस्था.

l इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग सायन्स ऍण्ड
टेक्नॉलॉजी शिबपूर.

l संत लंगोबॉल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी,  संगरूर पंजाब.

l डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी गिरीनगर, पुणे.

परीक्षेचे वेळापत्रक – 11 फेब्रुवारी 2024 

l पहिल्या सत्रामध्ये केमिस्ट्री, जिऑलॉजी, मॅथेमॅटिक्स विषयांची परीक्षा.

l दुसऱया सत्रामध्येबायोटेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स आणि फिजिक्स.

परीक्षा निकाल दिनांक 24 मार्च 2024

 परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू आहे.  5 सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले असून 13
ऑक्टोबर 2023 पर्यंत  नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी    https://jam.iitm.ac.in  या वेबसाईवर संपर्क साधा.

नोकरी, व्यवसायाच्या संधी

आयआयटी जेएएम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उपलब्ध करीअरच्या काही लोकप्रिय विषयांमध्ये पीएचडी करणे, संशोधन प्रयोगशाळांमध्ये काम करणे, विद्यापीठांमध्ये अध्यापन करणे आणि डेटा सायन्समध्ये करीअर करू शकता. इतर अतिरिक्त पर्याय जसे की, ONGC, NTPC, IOCL, BPCL, BARC, DRDO, ISRO सारख्या विविध संस्थांमध्ये वैज्ञानिक किंवा संशोधक होऊ शकता.

 सुदाम कुंभार (निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक)