
जम्मू कश्मीर मधील पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात एका शिवमंदिराचे नुकसान झाले आहे.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारपासून पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले होत आहेत. रविवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषेनजिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्याला हिंदुस्थानी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले.
मात्र, पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला तसेच मोर्टार डागण्यात आले. या हल्ल्यात येथील एक शिवमंदिर आणि काही घरांचे नुकसान झाले आहे.
पुंछ जिल्ह्यातील शाहपुर, किरनी आणि कसबा सेक्टर मध्ये हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
#Pak continues unprovoked #CeasefireViolations along LoC. Today initiated small arms firing & shelling with #Mortars along #LoC in Shahpur, Kirni & Qasba sectors in Distt #Poonch#IndianArmy retaliates befittingly@SpokespersonMoD@DefenceMinIndia@adgpi@diprjk@ddnews_jammu
— PRO & Spokesperson, MoD, Jammu Region (@prodefencejammu) November 1, 2020
शिवमंदिर आणि घरांशिवाय मन्यारी, चांदवा, लोंडी या गावांमध्ये तसेच कठूआ येथील काही भागांमध्ये गोळीबाराने नुकसान झाले आहे.
























































