
सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले असून आबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गणेशोत्सवात विविध देखावे साकारण्याची पंरपरा आहे. असेच विविध देखावे यंदाही साकारण्यात आले आहेत. यावर्षी झारखंडच्या जमशेदपूरमधील एका मंडळाने अनोखा देखावा साकारला आहे. त्यामुळे या मंडळाची चर्चा आहे. या मंडळाने गणपती बाप्पांच्या आधार कार्डचा देखावा साकारला आहे. हा देखावा बघण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
जमशेदपूरच्या साकची बाजारमध्ये गणपती बाप्पाच्या आधाकार्डचा देखावा साकारण्यात आला आहे. त्यावर बाप्पाच्या फोटोसह त्याचा आधार कार्ड क्रमांकही लिहिण्यात आला आहे. त्यावर श्री गणेश, एसओ महादेव, कैलास पर्वत, मानसरोवराजवळ ,कैलास पिनकोड 000001 असा पत्ताही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा आकर्षणाचा विषय ठरत आहे.
हे कार्ड स्क२न केल्यावर भगवान गणेशाचे दर्शन होते. त्यावेळी अनेक भाविक श्री गणेशासोबत सेल्फी घेतात. आपण कोलकातामध्ये अनेक दुर्गा मंडळांमध्ये जनजागृतीसाठी उभारलेले देखावे बघितले. त्यानंतर आपणही जनजागृतीसाठी असा देखावा उभआरण्याचे ठरवले. जनतेत आधारकार्डबाबत जनजागृतीसाठी आपण हा देखावा उभारल्याचे मंडळाचे संयोजक सौरभकुमार यांनी सांगितले. या देखाव्यातून आधारकार्डचे महत्त्व अधोरेखीत करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी आधारकार्ड बनवले नसेल, ते आधारकार्ड बनवण्यासाठी प्रवृत्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

























































