600 किलो चांदी, 4 किलो सोने, 8376 पुस्तके, 10,438 ड्रेस! जयललितांच्या बंगल्यात घबाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

600 किलो चांदी, 4 किलो सोने, 8376 पुस्तके, 10,438 ड्रेस मटेरियल, पूजेचे साहित्य आणि बरेच काही. स्थाकर आणि जंगम मालमत्तेचे हे मोठे घबाड बुधवारी तामिळनाडूमध्ये चर्चेचा विषय ठरले. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या चेन्नईतील ‘केदा निलायम’ बंगल्यातील 25 संपत्तीची यादी राज्य सरकारने जाहीर केली. बंगल्याचे स्मारक बनवण्यासाठी ही संपत्ती पुरात्ची थलैकी डॉ. जयललिता स्मृती फाऊंडेशनकडे सोपवली जाणार आहे. दरम्यान, जयललिता यांच्या बंगल्यात तब्बल 32,721 जंगम मालमत्ता असल्याची नोंद सरकारने केली आहे.