
नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. या आंदोलनापासून बचाव करण्यासाठी उभारलेली तटबंदी पाहून मोदींमध्ये अफगाणिस्तानचा नजीब खान दिसत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
भुसावळ येथे आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी पृषी कायदे आणि कामगार कायद्यांतील बदलावरून पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला. 1771 साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. त्यावेळी मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल या भीतीने अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान यानेदेखील अशीच तटबंदी उभारली होती. शेतकरी आंदोलनाच्या भीतीने केलेली तटबंदी पाहून मला मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, असे जयंत पाटील म्हणाले.
देशात आजवर कामगारांच्या हिताचे, कष्टकऱयांना संरक्षण देणारे कायदे आपण केले, परंतु मोदी सरकार त्या विरोधात काम करत आहे. ज्यावेळी देशातील शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा असंतोष आणि विरोध वाढत जाईल तेव्हा मोदींची लोकप्रियता अजून कमी होत जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.
माझा छळ भाजपला महाग पडेल -खडसे
नाथाभाऊला कसे तुरुंगात टाकता येईल यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. परंतु मी आयुष्यभर कधीही दोन नंबरचे धंदे केले नाहीत. नोकरीसाठी किंवा भरतीसाठी पुणाकडून एक रुपया घेतला नाही. त्यामुळे मला अडकवण्यासाठी भाजपकडून नुसती छळवणूक सुरू आहे. मला जेवढे छळाल तेवढे भाजपला महागात पडेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.


























































