पंतप्रधानांवर विश्वास अधिक दृढ होईल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश मुक्ती लढय़ातील सहभागाविषयी केलेल्या वक्तव्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही त्यांची यावरून फिरकी घेतली आहे.

बांगलादेश मुक्तीच्या लढय़ात मोदी यांना नक्की कधी अटक झाली याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवर विश्वास दृढ होईल असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.

बांगलादेशच्या दौऱयावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण बांगलादेश मुक्ती लढय़ात सहभागी झाल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाची जयंत पाटील यांनी सोमवारी ट्विट करून खिल्ली उडवली. पंतप्रधानांना मुक्ती लढय़ात कोणत्या तुरुंगात ठेवले होते याची माहिती त्यांनी द्यावी. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायलाच हवा, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज लगावला.