‘जेईई’ मेन परीक्षा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा उपाययोजना करून महाराष्ट्रासह देशभरात जेईई- मेन परीक्षा 1 सप्टेंबरपासून सुरू झाली. संसर्गाच्या भीतीने काहींनी परीक्षा टाळली तर काहींना पाऊस, पूर आणि वाहतुकीअभावी परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही. मात्र अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी न्यायालयाने दिली आहे.

परीक्षा केंद्रात प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांची थर्मल तपासणी केली गेली. वर्गामध्ये दोन बेंच सोडून प्रत्येक विद्यार्थ्याची आसनव्यवस्था केली गेली. मात्र त्यानंतरही अनेक विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतरही दडपणाखाली दिसले. मनाविरुद्ध परीक्षा देतोय अशा अनेक विद्यार्थ्यांच्या भावना होत्या, पण परीक्षा दिल्याचे समाधानही होते.

ड्रॉप आऊट वाढले

सुरक्षा उपाययोजना करून परीक्षा घेतल्या जात असल्या तरी अनेक विद्यार्थी या परीक्षांना गैरहजर राहिले. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे 44 टक्के गैरहजेरी नोंदली गेली. मागील वर्षी हे प्रमाण 15 ते 20 टक्के होते. एकंदरीत परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचा अहवाल आहे. मात्र कोरोना नियंत्रणात येईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असत्या तर आणखी सोयीचे झाले असते असे पालकांचे म्हणणे आहे.

‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी

जेईई सुरळीत होत असतानाच मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया ‘नीट’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे. 13 सप्टेंबरपासून ‘नीट’ परीक्षा होणार आहे.