श्री सिद्धिविनायकाच्या दागिन्यांचा लिलाव 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव रविवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत मंदिराच्या आतील परिसरात आयोजित करण्यात आला आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावा दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. भक्तांनी मोठय़ा संख्येने लिलावात सहभागी व्हावे, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे देण्यात आली आहे.