
झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता हे आपल्या बेदरकार वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पारसनाथ येथे काँग्रेसे चिंतन शिबिरामध्ये त्यांनी मुख्यमत्र्यांनीच काँग्रेसला संपवण्याची सुपारी घेतल्याचे म्हटले होते. आता एका होळीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्व नेते जोर आणि आमदार दरोडेखोर बनल्याचे म्हणत वाद ओढवून घेतला आहे.
जमशेदपूरच्या कदमा न्यू फॉर्म एरिया दुर्गा पूजा मैदाना सामूहिक भवनमध्ये होळीनिमित्ताने बन्ना गुप्ता फॅन्स क्लबतर्फे कवी संमेलनाचे आजोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता हे उपस्थित होते. या कवी संमेलनामध्ये बन्ना गुप्ता यांनी अनेक दमदार कविता म्हणत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र एका वक्तव्यामुळे ते वादात अडकले आहेत.
बन्ना गुप्ता यांनी एक कविता सादर केली. राजकीय नेते आणि पोलिसांवर त्यांनी निशाणा साधला. ‘कवियों के निशाने पर हमेशा नेता और पुलिस रहते हैं’, ‘चोर सभी वह नेता बन गए, डकैत बने एमएलए’, असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यावर राजकीय व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांवर निशाणा
याआधी आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी मुख्यंमत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीच काँग्रेसला बरबाद करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या चिंतन शिबिरामुळे शरिरात नवीन उर्जा आली आहे, परंतु सर्व लोक दुखात आहेत. आम्ही आघाडी करून सरकार तर चालवत आहोत, पण सरकारमधील आमची स्थिती नाव चालवणाराच तो बुडवतोय अशी आहे, असे ते म्हणाले.
…तर राजीनामा
ते पुढे म्हणाले की आम्ही मंत्री बनून फिरतोय, हे चांगलेही वाटतेय. परंतु आम्ही मंत्री कसे बनलो, जमशेदपूरसारख्या शहरातून एक लाख मत घेऊन कसे आलो हे विचार करण्यासारखे आहे. आपली विचारधारा आणि सिद्धांत कमकुवत होत नाही याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्याच्याशी समझौता करू शकत नाही. ज्या दिवशी राष्ट्रभाषा आणि माँ भारतीशी समझौता करण्याची वेळ येईल तेव्हा राजीनामा देईल असेही ते म्हणाले.
























































