
कोरोनामुळे बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांसाठी वर्क फ्रॉम होम धोरण राबवले आहे. परंतु लोक घरी राहल्याने केबल इंटरनेटवर ताण येत आहे. त्यामुळे जियो कंपनीने अशा कर्मचार्यांसाठी वर्क फ्रॉम होम प्लान आणला आहे.
जियोने 251 वाला दिवसाला 2 जीबी असलेला प्लान आणला आहे. या प्लानची वैधता 51 दिवस आहे. दिवसाला 2 जीबी डेटा मिळाल्याने कर्मचार्यांना घरून काम करणे सोपे होईल. या प्लानमध्ये फोन कॉलिंगसाठी वेगळा IUC रीजार्ज करण्याची गरज आहे.
BSNL नेही वर्क फ्रॉम होम वाल्यांसाठी एक प्लान आणला आहे. हा प्लान मोफत असून युजर्सना कुठलेच शुल्क द्यावे लागणार नाही. हा प्लान फक्त लँडलाईन ग्राहकांसाठी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांसाठी 10MBSP स्पीड मिळणार असून दिवसाला 5 GB डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 1MBPS स्पीडने इंटरनेत मिळले. जियोने अजूनही काही प्लान आणले आहे. त्यात 11, 21 आणि 51 रुपयांच्या प्लानच्चा समावेश आहे. जर ग्राहकांचा दिवसाचे इंटरनेट संपले असेल तर हे रीचार्ज करून ग्राहकांना अतिरिक्त डेटा मिळणार आहे.






























































