जियो युझर्सला तगडा धक्का, कॉलिंगची फुकट सेवा बंद

5272

दिवाळीच्या सणादरम्यान तुम्ही जियोवरून आपल्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना आणि पाठीराख्यांना शुभेच्छांचा कॉल करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण ’जियो’नी आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. नवीन नियमांनुसार आता जियोवरून फोन करणाऱ्या युझर्सला आता प्रति मिनिटाला 6 पैसे द्यावे लागणार आहेत. याआधी ही सेवा जियोकडून फुकटात मिळत होती.

दिवाळीनिमित्त जियोची ऑफर, 4G मोबाईल मिळणार अर्ध्या किंमतीत

ट्रायने 2017 मध्ये इंटरकनेक्ट युसेज चार्ज (आययूसी) 14 पैशांवरी 6 पैसे प्रति मिनिट केले होते. ट्रायकडून ‘कॉल टर्मिनेशन चार्ज’बाबत नव्याने विचारविनियम सुरू असतानाच मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोने बुधवारी युझर्सला तगडा धक्का दिला. जियो नेटवर्कवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता युझर्सला नवीन नियमानुसार पैसे द्यावे लागणार आहे. जियोने याबाबत एक पत्रक काढून माहिती दिली आहे.

जियो कंपनीच्या सिमकार्डवरून दुसऱ्या कंपनीच्या सिमकार्डवर फोन केल्यास प्रति मिनिटाला 6 पैसे द्यावे लागणार आहेत. याची भरपाई कंपनी तेवढ्याच पैशात फुकटात इंटरनेट डाटा देऊन करणार आहे, अशी माहिती जियो कंपनीकडून देण्यात आली आहे. फक्त जियो फोन किंवा लँडलाईनवर जियो सिमकार्डवरून फुकटात कॉलिंग सेवा देण्यात येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप, फेस टाईम आणि अन्य अॅपद्वारे केल्या जाणाऱ्या फोन कॉलवरही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच इन्कमिग सेवा पूर्वीप्रमाणेच मोफत असणार आहे, अशीही माहिती कंपनीने दिली आहे.

jio

दरम्यान, जियोवरून व्हाईस कॉलिंग सेवा फुकटात देण्यात येत असल्याने कंपनीला आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या अर्थात भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना ट्रायच्या नियमानुसार 13, 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागत होती. ट्रायच्या नियमांपासून वाचण्यासाठी जियोने आता अन्य नेटवर्कवर कॉलिंग सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे.

जियो गिगा फायबर ग्राहकांना मिळणार मोफत एलईडी टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स

ट्रायचा नियम

टेलिकॉम नियंत्रक ‘ट्राय’ने एका कंपनीने दुसर्‍या कंपनीच्या नेटवर्कचा वापर केला तर त्यासाठी इंटरकनेक्टेड युजेस चार्ज (आययूसी) ठेवला आहे. सुरुवातीला हा दर मिनिटाला 14 पैसे होता. ट्रायने 2017 मध्ये तो कमी करून 6 पैसे केला आणि 2020 पर्यंत हे शुल्क पूर्णपणे रद्द करू, असे आश्वासन ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिले आहे.  

हे काम करा आणि जियोचा डेटा मोफत मिळवा

‘आययूसी’मुळे जियोला 13,500 कोटींचा फटका

ग्राहकांना कमी किमतीत सेवा देणार्‍या जियोला या ‘आययूसी’ शुल्कापोटी एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या स्पर्धक कंपन्यांना  तब्बल 13 हजार 500 कोटी रुपये द्यावे लागले. आता हा तोटा भरून काढण्यासाठी जियोने थेट ग्राहकाच्या खिशात हात घातला आहे. हे ‘आययूसी’ शुल्क जियो ग्राहकांकडून वसूल करणार आहे आणि त्याऐवजी त्यांना तितक्याच किमतीचा डेटा मोफत देणार आहे.

‘आययूसी’ शुल्क असेपर्यंत ग्राहकांवर भार

ट्रायकडून वेळोवेळी आययूसी शुल्काचा आढावा घेतला जातो. या आढाव्यात ट्राय जी किंमत ठरवेल त्यानुसार जिओ या किमतीत बदल करत राहील. हे शुल्क पूर्णपणे रद्द होईपर्यंत ग्राहकावर याचा भार पडणार आहे, असे जिओने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या