जिओचे अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन पुन्हा सुरू, ग्राहकांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओने बंद केलेले 98 रुपये आणि 149 रुपयांचे जिओ टू जिओ अनलिमिटेड प्रीपेड प्लॅन पुन्हा सुरू केले आहेत. यात कॉलिंगबरोबरच दररोज 1 आणि 2 जीबी डेटा ग्राहकाला वापरता येणार आहे. त्यामुळे स्वस्तात मोफत कॉलिंग आणि डेटा वापरणार्‍या जिओच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  टेलिकॉम कंपन्यांनी नुकताच शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोबाईलवर बोलणे आणि डेटा वापरणे महाग झाले. त्याचबरोबर मोफत अनलिमिटेड कॉलिंगवरही ठरावीक मिनिटांची बंधने घातल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी होती. त्याचा जिओला फटका बसत असल्यामुळे जिओने हे प्लॅन पुन्हा बाजारात आणले आहेत.

एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचे 3 प्लॅन

अनलिमिटेड कॉलिंग फ्री केल्यानंतर आता एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांनी ग्राहकांसाठी 219, 399 आणि 449 रुपयांचे नवीन प्रीपेड प्लॅन आणले आहेत. हे प्लॅन्स 56 दिवसांसाठी असून दरदिवशी 1 जीबी डेटा ग्राहक वापरू शकतो. व्होडाफोन-आयडियाने 169 रुपयांच्या जुन्या प्लॅनमध्ये बदल करून तोच प्लॅन 50 रुपयांची वाढ करून 219 रुपयांमध्ये पुन्हा नव्याने आणला आहे, मात्र बाकीचे दोन प्लॅन पूर्णपणे नवीन आहेत. टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना चांगले प्लॅन पुन्हा उपब्लध होऊ लागले आहेत.