जम्मू-कश्मीरवासियांना नवीन वर्षाची भेट, इंटरनेट सेवा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरवासियांना केंद्र सरकारने नववर्षाच्या मध्यरात्री मंगळवारी अनोखी भेट दिली. गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा मध्यरात्री बाराच्या सुमारास काही ठिकाणी सुरू करण्यात आली. तर काही ठिकाणी एसएमएस सेवा सुरू करण्यात आली.  शाळा, कॉलेजेस आणि रुग्णालयांमध्ये  इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

जम्मू-कश्मीरमधून 5 ऑगस्टला 370 कलम हटवल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. व्हॉटसअॅप व एसएमएस, लँडलाईन फोनच्या माध्यमातून येथील जनतेला चिथावण्याचा उद्योग काही समाजकंटकांनी सुरू केला होता. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याचपार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण आता येतील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने काही भागात इंटरनेट व एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे.  विचार केंद्र सरकारने केला.