
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान जॉनने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणून ओटीटीपेक्षा मोठ्या पडद्यावरच आपल्याला जास्त आवड असल्याचे त्याने सांगितले. .
जॉन अब्राहम अभिनेता आहेच पण तो एक निर्माताही आहे. त्याने नुकतेच ईटाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याला निर्माता म्हणून ओटीटी स्पेस आवडतो. मात्र अभिनेता म्हणून नाही. त्याची प्रोडक्शन कंपनी जॉन अब्राहम एण्टरटेण्टने 2012 मध्ये शूजीत सरकारचा सिनेमा ‘विक्की डोनर’ आणि 2013 साली आलेला ‘मद्रास कॅफे’ला प्रोड्युस केले होते. जॉनने पुढे सांगितले की, एक निर्मात्याच्या रुपाने मला ओटीटी व्यासपीठ आवडतं. ओटीटीसाठी सिनेमे बनवायला आवडतात. मात्र एक अभिनेत्याच्या रुपात मला ओटीटीवर माझे सिनेमे प्रदर्शित झालेले आवडणार नाहीत. त्याबाबतीत मी स्पष्ट आहे.
जॉन पुढे म्हणाला, त्याला हे आवडत नाही की, लोकांनी घरात स्क्रिनवर 299 किंवा 499 रुपयांत महिन्याचे पेमेण्ट देऊन बघावे. त्यामुळे जर घरी त्यांचा सिनेमा बघता बघता टॅब मध्येच बंद केला तर त्याला ते फार वाईट वाटेल, पुढे तो म्हणाला मी एक मोठ्या पडद्यावरचा हिरो आहे आणि इथेचे झळकायची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी आता असा सिनेमा करीन जे मोठ्या प़डद्यानुसार असतील. मला प्रचंड वाईट वाटेल की, सिनेमा पाहताना घरातील कामानिमित्त मध्येच टॅब मध्येच बंद करणे. त्याचबरोबर मी 299 किंवा 499 रुपयात उपल्बध होऊ इच्छित नाही. मला ही समस्या आहे.
जॉन अब्राहमचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सिनेमा 29 जुलैला प्रदर्शित होत आहे. त्याच्यासोबत तारा सुतारिया, अर्जुन कपूर, दिशा पटानी दिसणार आहेत. हा सिनेमा अॅक्शन थ्रीलर असून एकता कपूर आणि भूषण कुमार यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे.



























































