नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेला साथ द्या!

30

सामना ऑनलाईन । नाशिक

ठिकठिकाणी युवक, महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला असून जनतेच्या शिवसेनेवरील प्रेमाला व विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेबरोबर असेच कायम रहा, साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिकजवळील भगूर येथे शनिवारी बसस्थानक नूतनीकरण व भुमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, येथील बसस्थानक नूतनीकरण कामाचे भुमिपूजन करताना आनंद होत आहे. मी कालपासून नाशिक जिह्यात फिरतो आहे. मालेगाव, नांदगाव यासह ठिकठिकाणी युवक, महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. देवळाली मतदारसंघात सलग सहावेळा भगवा डौलाने फडकत आहे, असाच तो महाराष्ट्रातील इतर मतदारसंघातही फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साडेचार वर्षांपासून केंद्रात आणि महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आहे, पण शिवसेना लोकांसाठी काम करते आहे. सत्तेत असली तरी लोकांच्या न्यायहक्कासाठी, शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या प्रश्नांसाठी लढत आहे. आम्ही सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबीर, मुलींसाठी स्व-संरक्षण कार्यक्रम घेत आहोत. पुढची भगवी सत्ता आहे. नागरिकांनी शिवसेनेवर केलेले प्रेम आणि ठेवलेला विश्वास याला तडा जावू देणार नाही. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी असेच शिवसेनेबरोबर कायम रहा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार योगेश घोलप यांच्या प्रयत्नातून भगूर बसस्थानकाचे नूतनीकरण होत आहे. यावेळी आमदार घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. देवळाली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, येथे कायम भगवा फडकत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून टेलीमेडिसीनच्या सुविधेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसांच्या दौऱ्यात आरोग्य शिबिरे, मुलींसाठीच्या स्व-संरक्षण प्रशिक्षणाला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. खासदार हेमंत गोडसे यांचे कार्य जबरदस्त आहे. नाशिकला त्यांनी विमानसेवा आणली. मध्यंतरी मुंबईप्रमाणे नाशिकमध्ये त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा दिली. शिवसेना जनतेसाठी दूरदृष्टी ठेवून काम करते. आज टेलीमेडिसीनची सुविधा सुरू करण्यात आली. गोडसे यांनी आगळीवेगळी सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. खासदार असावा तर असा, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी गोडसे यांचे कौतुक केले.

या सर्व कार्यक्रमांना शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, विस्तारक जय सरपोतदार, अमीत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर, सत्यभामा गाडेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर, हर्षा बडगुजर, सुधाकर बडगुजर, सुवर्णा मटाले, कल्पना पांडे, संगीता जाधव, श्याम साबळे, आर. डी. धोंगडे, प्रवीण तिदमे, सुदाम डेमसे, प्रशांत दिवे, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, काशीनाथ मेंगाळ, निवृत्ती जाधव, राजेंद्र नाठे, कुलदीप चौधरी, चंद्रकांत लवटे, नीलेश चव्हाण, नयना घोलप, अनिता करंजकर, प्रतिभा घुमरे, काकासाहेब देशमुख, अंबादास शिंदे, केसरीनाथ पाटील, ललीत शाईवाले, दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, राहुल दराडे, माणिक सोनवणे, सुभाष गायधनी, योगेश बेलदार, बाळू कोकणे, श्यामला दीक्षित, मंदाबाई दातीर, मंगला भास्कर, वैशाली राठोड, शोभा गटकळ, जगन्नाथ आगळे, सुनील जाधव, आदित्य बोरस्ते, सचिन बांडे, उमेश चव्हाण, दिलीप मोरे, शशीकांत कोठुळे, रवींद्र जाधव, अजिम सय्यद, शिवाजी भोर, राजू मोरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या