#फायद्याचंबोला – दिंड्याची भाजी आरोग्यदायक, जाणून घ्या रानभाजीची पाककृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dinda-ranbhaji

>> अभिषेक भटपल्लीवार

रानभाजी – दिंडा

स्थानिक नाव – ढोल समुद्रिका

शास्त्रीय नाव – Leea macrophylla

साहित्य- एक जुडी दिंडे, अर्धा वाटी मोड आलेले वाल, एक कांदा, सहा लसूण पाकळ्या, थोडासा गुळ, आमसुल / कोकम, ओल्या खोबऱ्याचा किस, कोथिंबिर, मोहरी, जिरे, हिंग, हळद, मीठ, तेल

दिंड्याची भाजीची कृती

 


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगाप्रमाणे दिसेपर्यंत सोला. नंतर चिरून धुऊन घ्या, तेल कढईत गरम करून मोहरी, जिरे व हिंग टाका. नंतर त्यात कांदा लसुण टाका. गुलाबी झाल्यावर त्यात गरम मसाला व चिरलेली भाजी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर ठेवा. भाजी शिजल्यावर त्यात गुळ, कोकम, कोथिंबीर व ओलं खोबरं, मीठ घाला.

औषधी गुणधर्म –

व्रणरोपक म्हणून दिंडा ही वनस्पती प्रसिद्ध आहे.
औषधात दिंड्याचे मुळ वापरतात.
वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत.

#फायद्याचंबोला – रानभाजी करटोली खा, आरोग्य जपा! अशी बनवा भाजी