आर्यलॅंडवरून परतलेल्या कल्याणमधील दोघांना कोरोनाची लागण

690

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने कोरोना बाधीत नवीन रूग्‍ण आढळून आलेले असून आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्‍णसंख्‍या आठ झाली आहे. नवीन रूग्‍ण आर्यलॅंडवरून परतलेले होते.

नवीन रुग्ण चिंचपाडा, कल्‍याण (पुर्व ) व राजाजी पथ, डोंविबली (पुर्व ) येथील आहेत. सदर दोन्‍ही रूग्‍णांच्‍या परिसरात महापालिकेच्‍या तिसगाव व मढवी नागरी आरोग्‍य केंद्रामार्फत सर्वेक्षण सुरू असून शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कंटेन्‍टमेंट प्‍लान तयार करण्‍यात आला आहे. पुढील 14 दिवस घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. कल्‍याण येथील रूग्‍ण हा आर्यलॅंडवरून परतला. त्यांना कस्‍तुरबा रूग्‍णालय येथे दाखल केले आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या