
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. या आगीत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
धुरात गुदमरला श्वास! अंधेरीच्या कामगार रुग्णालयात आकांत
सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास कामगार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा जास्त जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एसीचं काम करणाऱ्या कंत्राटदारासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वरळीच्या कामगार रुग्णालयालाही आगीचा धोका
दरम्यान, कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. या चौकशीमुळे रुग्णालयाला लागलेल्या आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.




























































