
वाशीमधील निवासी इमारतीला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या काही तासानंतरच कामोठे येथील अंबे श्रद्धा या निवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीत आई व मुलीचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र नंतर आग मोठ्या प्रमाणात वाढल्याने घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रेखा शिसोदिया आणि पायल शिसोदिया असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.