
नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱया अभिनेत्री कंगना राणावतचे डोके पुन्हा फिरले आहे. ‘देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले आहे’, असे भयंकर विधान कंगनाने केले. कंगनाच्या या माथेफिरू वक्तव्यामुळे देशभरात आणि नेटकऱयांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देशासाठी बलिदान करणाऱया हजारो स्वातंत्र्ययोद्धय़ांचा कंगनाने अपमान केला. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घ्या, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनी ‘टाइम्स नाऊ’च्या समिटमध्ये कंगना राणावतची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी कंगना नेहमीप्रमाणे बरळली. धक्कादायक म्हणजे, केंद्र सरकारकडून तीन दिवसांपूर्वीच नागरी सन्मान ‘पद्मश्री’ पुरस्कार कंगनाला देण्यात आला आहे.
‘सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहीत होते; मात्र हिंदुस्थानींकडूनच हिंदुस्थानींवर वार होणार हे ध्यानात ठेवायला हवे होते. स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. मात्र, 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हते, तर ती भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले.’ असे कंगना म्हणाली. अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळाले, असा जावईशोध कंगनाने यावेळी लावला. तिचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा वेडेपणा की देशद्रोह?
भाजप खासदार वरुण गांधी यांनी तर कंगनाचा तो व्हिडीओ शेअर करत ‘हा वेडेपणा म्हणावा की देशद्रोह?’ असा संतप्त सवाल केला आहे. वरुण गांधी यांनी कंगनाच्या वक्तव्याचा ट्विटरवरून निषेध केला आहे. ‘कधी महात्मा गांधींजींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱयांचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान… या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
कभी महात्मा गांधी जी के त्याग और तपस्या का अपमान, कभी उनके हत्यारे का सम्मान, और अब शहीद मंगल पाण्डेय से लेकर रानी लक्ष्मीबाई, भगत सिंह, चंद्रशेखर आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस और लाखों स्वतंत्रता सेनानियों की कुर्बानियों का तिरस्कार।
इस सोच को मैं पागलपन कहूँ या फिर देशद्रोह? pic.twitter.com/Gxb3xXMi2Z
— Varun Gandhi (@varungandhi80) November 11, 2021
अशा भरकटलेल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करायला हवे – अनुपम खेर
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी कंगनाचा नामोल्लेख न करता तिला भरकटलेल्या प्राण्याची उपमा दिली आहे. ‘हजारो वर्षांपासून काही लोक हिंदुत्वाला बरवाईट म्हणत आहेत. शिव्या देत आहेत. नाव ठेवत आहेत. अशा भरकटलेल्या प्राण्यांना एकतर माफ केले पाहिजे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. अशा प्रसंगी हिंदुत्व हे आणखी मजबूत होते. कारण हिंदुत्व हा एक धर्म नसून जीवनपध्दती आहे.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
हज़ारों सालों से कुछ लोग हिंदुत्व को भला बुरा कह रहें है।गाली दे रहें है! अलग अलग नाम दे रहें है।ऐसे भटके हुए प्राणियों को या तो माफ़ कर देना चाहिये या इग्नोर।ये जानते नहीं कि ऐसे मौक़ों पर हिंदुत्व और भी मज़बूत होता है।क्योंकि हिंदुत्व केवल धर्म नहीं, जीवन जीने का तरीक़ा है!🙏🕉
— Anupam Kher (@AnupamPKher) November 11, 2021
कंगनाविरुद्ध मुंबई पोलिसांकडे तक्रार
कंगना राणावतविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी ही तक्रार दिली आहे. कंगनाचे वक्तव्य शांतता भंग करणारे, खोडसाळपणाचे आणि देशद्रोही आहे. तिच्यावर आयपीसी कलम 504, 505 आणि 124-अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
.@PreetiSMenon, National Executive Member of AAP & Mumbai Prabhari, on behalf of @AAPMumbai has written a letter to the Maharashtra CM @OfficeofUT, for the withdrawal of Kangana Ranaut’s Padma Shri Award in light of her seditious public statement at the Times Now Summit 2021. pic.twitter.com/6bglTld37L
— AAP Mumbai (@AAPMumbai) November 11, 2021
त्या वक्तव्यावर टाळय़ा वाजवणारे मूर्ख – स्वरा भास्कर
कंगनाच्या वक्तव्यावर बॉलीवूडमधूनही हल्ला होत आहे. ‘कंगनाच्या त्या वक्तव्यावर टाळय़ा वाजवणारे मूर्ख कोण आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे.’ असे ट्विट अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केले आहे.
Who are the idiots who are clapping is what I want to know.. https://t.co/LRhbGjHsxF
— Swara Bhasker (@ReallySwara) November 10, 2021
कंगनाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार रद्द करा़
शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱहे यांनीही कंगनाचा खरपूस समाचार घेतला असून तिचा पद्मश्री पुरस्कार रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. पुढे बोलताना डॉ. गोऱहे म्हणाल्या की, कंगना हिचे वक्तव्य अतिशय बेजबाबदार, निराधार असे हे स्वातंत्र्ययोद्धय़ांचे अपमान करणारे विधान असून त्याचा जाहीर निषेध आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी ही अभिनेत्री आहे.
#Kangana #KanganaRanaut अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्यबद्दल केलेल्या बिनडोक विधानांचा शिवसेना उपनेत्या ना.डॉ.नीलम गोऱ्हेनी घेतलेल्या समाचाराचा व्हिडीओ…*@ShivSena @rashtrapatibhvn @rautsanjay61 @LoksattaLive @mataonline@lokmat @SaamanaOnline @NaviUmed pic.twitter.com/g1kT2vTA55
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 11, 2021



























































