कान्स फिल्म फेस्टिव्हल, मुंबईतील पायल कपाडियाच्या लघुपटाने मारली बाजी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

74व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पायल कपाडिया दिग्दर्शित ‘अ नाईट ऑफ नोइंग नथिंग’ने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा ‘गोल्डन आय’ पुरस्कार पटकावला आहे. या महोत्सवात वेगवेगळ्या विभागात दाखवल्या गेलेल्या 28 लघुपटांमधून मुंबईच्या पायल कपाडियाच्या लघुपटाने बाजी मारली आहे. डायरेक्टर फोर्टनाईट या विभागात हा लघुपट प्रदर्शित झाला होता.

महोत्सवात सर्वेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिग्दर्शिका ज्युलिया डिकॉर्नच्या ‘टायटेन’ या चित्रपटाने पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणाऱया जुलिया दुसऱया महिला दिग्दर्शिका ठरल्या आहेत. यापूर्की दिग्दर्शिका जेन कॅम्पियनने 1993 साली हा पुरस्कार पटकावला होता. डिकॉर्नचा हा दुसराच चित्रपट असून यात गुन्हेगार महिलेची कथा सांगण्यात आली आहे.

सर्केत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अमेरिकेच्या कालेब लँड्री जोन्स यांनी ‘नित्रम’ या ड्रामा-थ्रिलर चित्रपटासाठी पटकावला. तर नॉर्केच्या रेनेट रिन्सके ‘वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड’ या रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपटासाठी सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या आहेत. गतवर्षी कोरोनामुळे कान्स महोत्सव रद्द करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून यंदाच्या महोत्सवात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. अनेक भाषांचे आणि देशांचे चित्रपट यात सहभागी झाले होते. या फेस्टिव्हलची सांगता पुरस्कार सोहळ्याने झाली.