कराड तालुक्यातील 104 ग्रामपंचायत सरपंच निवड 23 व 24 फेब्रुवारीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींची सरपंच निवड 23 व 24 फेब्रुवारी होत आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छुक असलेल्यांना पदभार स्वीकारण्याचे वेध लागले होते. मात्र, मध्यंतरी त्याला स्थगिती मिळाल्याने कराड तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पुन्हा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

तालुक्यातील 104 ग्रामपंचायतींच्या निवडणुक निकालानंतर 29 जानेवारीला सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच गावोगावी सत्तास्थापनेची मोर्चेबांधणी सुरू होती. दरम्यान, उच्च न्यायालयात आक्षेप घेण्यात आला. यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आदेश जाहीर केला. यानुसार तालुक्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वाकडे यांनी तालुक्यातील सरपंच निवडी घेण्याचे आदेश जारी केले आहेत.

23 फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचपदाच्या निवड गावांची नावे : हजारमाची, किरपे, विंग, कार्वे, मुंढे, ओंड, शेरे, मालखेड, घोणशी, घारेवाडी, खुबी, गायकवाडवाडी, शहापूर, म्हासोली, कालवडे, साकुर्डी, जखिणवाडी, भोळेवाडी, धोंडेवाडी, पोतले, साळशिरंबे, शेवाळवाडी (म्हासोली), सवादे, केसे, घोगाव, गोटेवाडी, कोणेगाव, शिवडे, वस्ती साकुर्डी, उंब्रज, इंदोली, मरळी, तासवडे, शिरवडे, शिरगाव, वहागाव, तांबवे, खराडे, पाल, साजुर, गोळेश्वर, वारूंजी, चिखली, वाठार, कोळे, सैदापूर, येरवळे, गोटे, नांदलापूर, काले, उंडाळे, पार्ले, निगडी, बनवडी, पेरले, विरवडे, करवडी, कोडोली, गोवारे, बेलवडे हवेली या गावाची सरपंच निवड होईल.

24 फेब्रुवारीला होणाऱ्या सरपंचपदाच्या निवड गावांची नावे : कामथी, येणके, शिंदेवाडी (विंग),जिंती, शेणोली, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, गमेवाडी, बेलदरे, म्होप्रे, नांदगाव, म्हारुगडेवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (उंडाळे), पाडळी-केसे, टाळगाव, भुरभुशी, रिसवड, भवानवाडी, अंबवडे, खालकरवाडी, हरपळवाडी, वडगाव उंब्रज, वराडे, वडोली निळेश्वर, चोरे, खोडशी, आबईचीवाडी, नवीन कवठे, खोडजाईवाडी, कोपर्डे हवेली, बेलवडे बुद्रुक, बामणवाडी, पाचुंद, चचेगाव, वसंतगड, भरेवाडी, चौगुलेमळा, आकाईचीवाडी, हणबरवाडी, भुयाचीवाडी, वाघेरी, सुर्ली या गावांची निवड होईल.

तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी ६१ अध्यासी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सरपंच निवडी दिवशी सकाळी 10 ते 12 यावेळेत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करता येतील. दुपारी दोन वाजता सभेस सुरवात होईल. त्यानंतर प्रथम दाखल अर्जांची छाननी, अर्ज माघार व त्यानंतर एकपेक्षाअधिक उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिल्यास मतदान, अशी प्रक्रिया होणार आहे, असेही वाकडे यांनी सांगितले.